नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील मानिकनगर भागात पार्किंगमध्ये चारचाकीची साफसफाई करीत असतांना इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामबहादुर गुमन बुढा (५७ रा.श्रमिक सोसा.मानिकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुढा गुरूवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे चारचाकीचे साफसफाई करीत असतांना ही घटना घडली. अचानक इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ते दुरवर फेकले गेले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व हातास दुखापत झाल्याने पत्नी बालकुमारी बुढा यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.