बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचे अडीच कोटीचे पारितोषिक जाहीर…यांची झाली निवड

by India Darpan
जून 26, 2024 | 7:57 pm
in राज्य
0
IMG 20240626 WA0313

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी महामंडळाने घेतलेल्या ” हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगावं जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. या अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.२५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.१० लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे,२०२३ ते ३० एप्रिल,२०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ” हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.

या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रदेशनिहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे. एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले असून, या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक” ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रूजविण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

IMG 20240626 WA0290
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये शिक्षक निवडणुकीत पैसे वाटप करत असतांना एक जण ताब्यात, गुन्हा दाखल

Next Post

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा जुने सिडकोला जोडणारा रस्ता त्वरित खुला करा; अन्यथा तीव्र आंदोलन

India Darpan

Next Post
IMG 20240626 WA0320 2

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा जुने सिडकोला जोडणारा रस्ता त्वरित खुला करा; अन्यथा तीव्र आंदोलन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011