इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे आई व दोन वर्षीय लहान बालकाचा मृतदेह एका शेततळ्यात आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सुजाता भूषण निचीत (२६) व गुरु भूषण निचीत (२) असे दोघा मायलेकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
या घटनेची माहिती कळताच सर्वांनाच धक्का बसला. माय लेकांना आत्महत्या केली की ते तळ्यात बुडाले हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर गावक-यांनी एकच गर्दी करत हळहळ व्यक्त केली. आईचे वयही फार नव्हते. तीन वर्षापूर्वीच लग्न झाल्याचे बोलले जात आहे.