इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आमदार रोहित पवार चांगलेच चर्चेत आले. काका विरुध्द पुतण्या असा सामना चांगलाच रंगला. बारामतीत त्यांनी केलेला प्रचार व अजितदादा विरोधात घेतलेली भूमिकाही चर्चेत राहिली. पण, या सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते वैयक्तिक आयुष्यात सुध्दा तितकेत संवेदनशील असतात. आता त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याचे शिर्षक बाप… असे दिले आहे. हा गमंतीदार व्हिडिओ असला तरी त्याची चांगलीच चर्चा आहे.
या व्हिडिओबरोबर त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, राजकारण, समाजकारणात काम करताना घरीही काही अत्यावश्यक कर्तव्ये पार पाडावी लागतात… कारण ही वेळ पुन्हा येत नाही. यापूर्वी कन्या आनंदिता हिलाही अशीच सायकल शिकवली आणि आता चिरंजीव शिवांशला… यावेळी मात्र पत्नी कुंती आणि आनंदिता यांनी प्रोत्साहन देऊन एकप्रकारे त्याला सायकल शिकण्यास मदतच केली…