कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -लोकसभा निवडणुकीनंतर कराडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस, मलकापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र यादव आबा यांच्यासह तीन विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसच्या नेतृत्वात पृथ्वीराज चव्हाण यांची बहुमतामध्ये सत्ता आहे. पण याच सत्तेला सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले आहे.
या पक्षांतरामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अतुल भोसले यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.