मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुशील मोरजकर आणि गौरव शर्मा तसेच उबाठा डॉक्टर सेलचे विविध पदाधिकारी आणि अहिल्यानगर ( अहमदनगर ) येथील प्रजेश पवार आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज नंदनवन या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख अजय भोसले आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.