व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ… गुंतवणूकदारांचे ३ लाख १० हजार कोटी बुडाले…बघा नेमकं काय घडलं

India Darpan by India Darpan
October 23, 2023 | 8:01 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शेअर मार्केट म्हणजे क्षणाक्षणाला उलथापालथ हे ठरलेले आहे. कधी मार्केट उसळी मारतो तर कधी एकदम खाली पडतो. अशातच मागील आठवड्यात भारतीय बाजार घसरल्याने नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित भांडवलमूल्य तीन लाख दहा हजार ९५८.०१ कोटींनी कमी झाले. कागदोपत्री गुंतवणूकदारांचे तीन लाख दहा हजार कोटी रुपये बुडाले आहेत.

परकीय वित्त संस्थांकडून होत असलेली विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे वाढत असलेले दर यामुळे बाजारावर निराशेचे ढग दाटले असून, त्याचे पडसाद आगामी सप्ताहात उमटू शकतात. गत सप्ताहात बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले. पर्यायाने स्मॉल कॅपचा अपवाद वगळता अन्य सर्व महत्त्वाचे निर्देशांक खाली आले. सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील विक्री बाजाराला खाली आणत आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी सातत्यपूर्ण खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, तरी ते कमी पडले. आगामी सप्ताहात सुमारे अडीचशे कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यांच्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.

युद्धामुळे वित्तसंस्थांचा सावध पवित्रा
अमेरिकेमधील बाँडचे व्याजदर पाच टक्क्यांवर गेले आहेत. येत्या काळात त्यात वाढीची शक्यता आहे. जगावर युद्धाचे ढग असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी सावध पवित्रा घेत गुंतवणूक काढण्याचे धोरण कायम ठेवले. गुंतवणूक काढून ती अमेरिकेत गुंतवण्यात संस्था गुंतल्या आहेत. परकीय वित्तसंस्थांनी भारतातून २७९९.०८ कोटी रुपये काढले. देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३५१०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.


Previous Post

नाशिक जिल्हा परिषद सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल जाहीर…इतके कर्मचारी झाले उत्तीर्ण

Next Post

रांगोळी, तोरण, सनई वादन, पेढ्यांचे वाटप….असे झाले नाशिकला…. स्त्री जन्माचे अनोखे स्वागत

Next Post

रांगोळी, तोरण, सनई वादन, पेढ्यांचे वाटप….असे झाले नाशिकला…. स्त्री जन्माचे अनोखे स्वागत

ताज्या बातम्या

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी२० सामन्यात केला पराभव..मालिकाही जिकंली

December 1, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.