मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सराफा बाजारातील एका सराफा व्यवसायिकाच्या दुकानातून जवळपास ९ किलो चांदी चोरून नेल्याची घटना घडली. हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
तीन चोरटे बाईटवर आले आणि त्यांनी ही चोरी केली आहे. सराफा बाजार हा किल्ला पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर असतांना ही घटना घडल्याने सराफा व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत दुकानात प्रवेश करत ही चोरी केली.