इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ३९ तर आज ११ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले. त्यामुळे अर्ज नेणा-यांची संख्या ५० झाली आहे. या निवडणुकीसाठी आज तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात दोन अर्ज राजेंद्र विखे पाटील (लोणी), तर तीन अर्ज निशांत विश्वासराव रंधे (शिरपूर) यांनी भरले. यातील दोन अर्ज अपक्ष तर एक अर्ज भाजपकडून रंधे यांनी दाखल केला. पण, या अर्जासोबत एबी फॅार्म जोडला नाही. तर एक अर्ज राजेंद्र दौलत निकम (मालेगाव) यांनी भरला.
शुक्रवारी या निवडणुकीसाठी दोन अर्ज कोल्हे विवेक विपीनदादा यांनी भरले होते. तर तिसरा अर्ज डॅा. पानसरे छगन भिकाजी यांनी भरला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणा-यांची संख्या पाच झाली असून त्यांनी ९ अर्ज दाखल केले आहे. २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
तर बघा अर्ज घेऊन जाणा-यांची यादी….