इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले तर तब्बल ३९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नले. आज कोल्हे विवेक विपीनदादा यांनी दोन तर तिसरा अर्ज डॅा. पानसरे छगन भिकाजी यांनी भरला. २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. तसेच ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान होणार आहे. १ जूलै रोजी मतमोजणी होणार आहे. ५ जूलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_20240531-174447_Drive-706x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_20240531-174451_Drive-887x1024.jpg)