मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत फुट पडल्यावर शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबिय आले एकत्र…. हे आहे कारण

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2023 | 8:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F9DGjFXXMAApvBX

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री आज दौंडमधील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र आले. राष्ट्रवादीत फुट पडल्यावर पवार कुटुंब पहिल्यांदाच स्वत:च्या संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र आल्यामुळे पवार कुटुंबियांच्या हितचिंतकांना चांगले वाटले. या कार्यक्रमात कोणीही एकमेकांवर आरोप केले नाही. पण, शरद पवारांचे भाषण संपल्यानंतर अजित पवार लगेच निघून गेले.

या कार्यक्रमात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार या नणंद भावजई फोटोसेशन करताना दिसल्या. सध्या या दोघांची चर्चा राजकीय पटलावर जोरात आहेत. एकमेकांच्या विरोधात त्या उभ्या राहणार असल्याचे बोलले जात आहे. पण, आज या दोघांनी एकत्र फोटो काढून या चर्चेला उत्तर दिले.

या कार्यक्रमात शरद पवार यांचे संपूर्ण भाषण बघा….
आज एका चांगल्या वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व एकत्र आलोत. ही संस्था १९७२ साली आम्ही सुरू केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ६७ साली जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि नंतरच्या काळात काही ना काहीतरी विधायक काम केले पाहिजे तेव्हा लक्ष घालायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा निवडून आल्यावर आमचे काही सहकारी विनोद कुमार गुजर, तुषारभाऊ, हरी भाऊ देशपांडे, डॉ. उम्रा शहा, श्रेयस उंडे, शरद वाडकर असा एक संच आम्हा सर्वांचा होता. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला की, एक शिक्षण संस्था आपण या ठिकाणी सुरू करायची. आणि त्यासाठी मार्गदर्शन बारामती मधील जुने हायस्कुल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे तिथे एक मुख्याध्यापक होते त्यांचे नाव मी. जी. घारे त्यांचा सल्ला घेवून आम्ही या संस्थेची स्थापना केली.

मला आठवतं त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मुंबईत जिजिरभाईं हे नाव फार मोठे होते. त्यांना मी सांगितलं की, आम्ही संस्था उभी करत आहोत आणि त्यासाठी तुम्ही यायला हवे आणि ते उपस्थित राहून त्यांनी उद्घाटन केले. आज संस्थेला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालखंड झाला आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो, देशाच्या बाहेर देखील जातो आणि अनेक वेळा परदेश दौरे देखील करतो तेव्हा काही लोक भेटायला येतात आणि ते हक्काने सांगतात की, आम्ही वी.पी चे विद्यार्थी आहोत.

आमच्यातीलच एक विद्यार्थिनी अनुपमा हेंगडे वियना मध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक त्या ठिकाणी झाली आणि ती याच संस्थेची विद्यार्थिनी होती. कधीकाळी ती हैदराबादला देखील असायची, तेव्हा मी देशाचा कृषि खात्याचा मंत्री होतो. तेव्हा हैदराबादला जगातल्या २८ देशांनी मिळून शेतीवर संशोधन करणारी एक संस्था काढली. आणि एक दिवशी त्या संस्थेत मी गेलो त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी होतो. तेव्हा त्या संस्थेत अनुपमा आणि माझी भेट झाली तेव्हा तेथील लोकांनी मला सांगितले की, ही मुलगी तुमच्या भागातील आहे. ती शेतीवर उत्तम प्रकारे संशोधन करते आणि ती याच संस्थेची विद्यार्थिनी आहे. असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेत उच्च पदावर काम करत आहेत.

७२ साली ही संस्था सुरू झाली. आज येथे ३२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. आणि त्यात प्रामुख्याने १५ हजार मुली आहेत. १ हजार ८०० हून अधिक शिक्षक, २९८ एकराचा कॅम्पस विविध भागात आहे. आज जी एक नवीन जिसूसीन सुरु केली त्यात विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठान तेथील कृषिका महाविद्यालय यांचे योगदान त्यात अधिक आहे. आणि त्यातील विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि याचा अर्थ म्हणजे जगात आता प्रचंड बदल व्हायला लागलेले आहेत. उद्या तुमच्या उसामध्ये साखर किती आहे आणि त्याची तोडणी कधी केली पाहिजे हे या AI च्या मार्फत सहज शक्य आज झाले आहे किंवा अनेक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील बदल हे या बदलत्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे शक्य होणार आहे. आणि या तंत्रज्ञानाचे संशोधन मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात सुरू आहे त्याचाच एक भाग आज आपण आपल्या संस्थेत सुरू केला. माझी खात्री आहे या दोन्ही संस्था ज्या पद्धतीने काम करायचे त्याची काळजी घेऊन काम करतील. आणि या भागातल्या शेतीचे जेवढे क्षेत्र असो, दुग्ध व्यवसाय असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम येथे केले जाईल.

रयत शिक्षण संस्थेमध्ये ४ लाख विद्यार्थी आहेत त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे तेथे अनेक कामे केली जातात. मुंबईत मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे. त्यांच्या अनेक शाखा आहेत जसं की कोकण, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आहेत त्याचा मी अध्यक्ष आहे तेथेही अनेक विद्यार्थी शिकतात. उरळी कांचन येथे महात्मा गांधी शिक्षण संस्था नावाची एक अतिशय उत्तम संस्था आहे तेथे ही हजारो विद्यार्थी शिकतात त्याचाही मी अध्यक्ष आहे. अशा अनेक वेगवेगळ्या संस्थेमध्ये शिक्षणाच्या पद्धतीचं बदल होत आहेत त्या बदलाची नोंद या संस्थेने घेतली पाहिजे आणि गुणवत्ता वाढीचे काम यात करायला हवे हे मी आवर्जून सांगू इच्छितो.

अजितच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय उत्तम संस्था आहे, जिथे १ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. आज अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत त्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर कसे भर देता येईल याचे काम सर्वांनी करायला हवे.

आज अनंतराव पवार म्हणजे माझे वडील बंधू ते अतिशय कर्तुत्ववान असे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचे हस्ताक्षर अतिशय मोत्यासारखे होते. अतिशय सुवाच्च हस्ताक्षर हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी काही कारणास्तव त्यांना कॉलेज सोडावे लागले आणि ते सोडल्यानंतर आमच्या मातोश्री अतिशय कडक होत्या. शिक्षण अर्धवट सोडलेले त्यांना आवडत नसत हे तात्या साहेबांना माहीत असल्यामुळे त्यांनी कॉलेज सोडल्यानंतर लगेचच मुंबई गाठली. त्यांचे कोणतेही मित्र नव्हते ते राजकमल सूर्य मध्ये त्यांनी व्ही. शांताराम सोबत काम करत ते तिथेच जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या कामात त्यांना सहकार्य करणे यात त्यांनी लक्ष घातले. काही काळानंतर आम्हीच सर्व भावडांनी आईकडे आग्रह केला की, त्यांना परत बोलवायला हवे आणि त्यांना बोलावले गेले आणि सबंध शेतीचा व्यवसाय त्यांनी सांभाळला. हे करत असताना माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभ्या राहण्याच्या परिस्थितीत होतो. माझे वय तेव्हा २६ होते आणि आमदारकीची निवडणूक लढवायची ठरवली तर मोठे लोक विरोधक होते. तेथील एक साखर कारखाना पूर्ण ताकदीने माझ्या विरोधात उभा होता आणि त्यामुळे निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळे ते यश आले पण दुसऱ्या बाजूने तात्या साहेबांनी आणि आप्पा साहेबांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि घरोघर जाऊन लोकांना मला निवडून कसे आणता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निवडणुकांना एवढा खर्च होत नसेल परंतु जे काही व्हायचं ते संपूर्ण जबाबदारी तात्या साहेबांनी अर्थकारण हातात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने गाजावाजा न करता पार पाडली आणि मोठ्या मतांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आणि त्यात अनेकांनी हातभार लावले परंतु तात्या साहेबांचे योगदान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांचा स्वभाव हा माणसं जोडण्याचा स्वभाव होता ते सहकारी चळवळीत देखील काम करायचे. छत्रपती साखर कारखान्यात ते संचालक होते. कारखान्याच्या कामात त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असायचे. शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक कशी करता येईल त्यात ते बारकाईने लक्ष द्यायचे आणि या पद्धतीने गावची ग्रामपंचायत असेल, गावातील अन्य संस्था असतील, गावातील साखर कारखाना असतील किंवा निवडणुकीतील माझ्यासारखे सहकारी असतील या सर्वांमागे प्रकर्षाने पाठिंबा देत उभे राहण्याचे कर्तव्य तात्या साहेबांनी उभ्या आयुष्यावर केली आणि हे करत असताना त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही त्यांनी सतत आमचा विचार केला. माझ्यापेक्षा सुप्रियाचा अधिक विचार ते सतत करायचे आणि अशा प्रकारचे एकावेळी वेगळे स्वभावाचे ते व्यक्तिमत्व होते.

तात्या साहेबांचा मृत्यू ज्यावेळी झाला अक्षरशः त्याच मिनिटाला सुप्रियाच्या मुलाचा जन्म झाला त्याचे नाव विजय. विजयचा जन्म आणि तात्या साहेबांचा मृत्यू यांची वेळ एकच होती आणि त्यामुळे तात्यासाहेब गेले आणि विजयला पाहून असे वाटले की, तात्यासाहेब पुन्हा आमच्यातच आहेत. अशाप्रकारेची भावना आमच्या मनात सतत येते.

शारदा निकेतन ही संस्था मुलींसाठी मोठ्या प्रमाणात एक वेगळे काम करत आहे. जसे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने काम केले जाते तसे अतिशय चांगले काम शारदा निकेतन आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केले जाते. आज सुप्रिया जी संस्था चालवते त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी २५० मुला- मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांचे शिक्षण सबंध केले जाते याची जाहिरात कुठे केली जात नाही. आणि अशाच अनेक संस्था अजित आणि मी किंवा पवार कुटुंबीय चालवतात. उद्दिष्ट हेच आहे की, शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आणि व्यक्तिगत जीवनातील त्यांचे संकटे ज्ञानाच्या मार्फत दूर व्हावेत आणि त्यासाठीच अशा संस्था या काम करत आहेत. येणारी नवीन पिढी या संस्थेमुळे अनेक उत्तम कामे करू शकेल याची खात्री आज मला या ठिकाणी वाटत आहे.

ही शाखा काढण्याची एक पार्श्वभूमी आहे येथे एक सीनियर बझ नावाचा कारखाना होता या ठिकाणी तो येणार नव्हता. माझे एक मित्र होते ते आता हयात नाहीत त्यांचे नाव ललित थापर. ही त्यांचीच कंपनी होती. कागद तयार करण्याच्या क्षेत्रातील ते एक मोठे उद्योजक होते. मी त्यांना सांगितले, तुमचे कारखाने चंद्रपूरला, चंदिगड, मध्यप्रदेश, अशा मोठमोठ्या भागात आहेत तर माझ्या भागात देखील तुम्ही कारखाना काढला पाहिजे. हो-नाही म्हणत म्हणत आम्ही बैठका घेतल्या आणि विचार विनिमय करून ही कंपनी आम्ही येथे स्थापित केली आणि मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात. पण त्यांच्या स्टाफने असे सांगितले की, येथे शिक्षणाची सोय नाही तर मग आमच्या मुला-मुलींनी करायचे काय ? तेव्हा आम्ही सांगितले की, सुरुवातीला बारामतीला विद्या प्रतिष्ठान येथे जाण्या येण्याची सोय आम्ही करू एवढेच नव्हे तर तुमची फी देखील भरू, तेव्हा त्यांनी सांगितले की, येथे देखील शिक्षण संस्था उभी करायला हवी तेव्हा या शिक्षण संस्थेचा येथे जन्म झाला. तेव्हा मी त्यांना शब्द दिला की, अशी शिक्षण संस्था काढून अशी भव्य इमारत उभारू की, लोक तेथे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतील आणि मुलांची शैक्षणिक दृष्ट्या वाढ होईल. आम्ही त्याची खात्री दिल्यानंतर आज त्याची पूर्तता होत आहे याचा मला आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या इमारतीचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो आणि यातून उत्तम विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार होतील, जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील. आणि पुनःश्च तुमच्या सर्वांच्या साक्षीने शाळेचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो.

विद्या प्रतिष्ठानचे 'अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल', या नूतन वास्तूचे उद्घाटन व नामकरण समारंभाला उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अगस्त्याने उपस्थित राहिलेले हर्षवर्धन पाटील, भरणे मामा, अशोक पवार, कोकण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मगर, विद्या प्रतिष्ठानचे सर्व… pic.twitter.com/dvFQhA2qjF

— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 22, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा समाज आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले…. हे भावनिक आवाहन

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वेडा जेव्हा बिडी पितो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - वेडा जेव्हा बिडी पितो

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011