नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रामवाडी आणि गोदाघाट भागात सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या क्रेटा कारसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राहूल अशोक पाटील (रा.श्रध्दापार्क रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील यांची सुमारे २० लाख रूपये किमतीची एमएच १५ एचयू ४०४३ क्रेटा कार बुधवारी (दि.२९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना गंगाघाट भागात घडली. रिमा सुरेश चौरे (रा. मेहरधाम,पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौरे मंगळवारी (दि.२८) सायंकाळी गोदाघाट भागात गेल्या होत्या.
साईबाबा मंदिर परिसरात पार्क केलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जेके २२३६ चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार माळोदे व शेवाळे करीत आहेत.