इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीत तासगाव-मणेराजुरी राज्य महामार्गावर अल्टो कारच्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात सुदैवाने एक मुलगी बचावली आहे. तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली.
तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील यांची नात राजवी हिचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे कुटुंब अल्टो कारमधून गेले होते. राजेंद्र यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली, पत्नी आणि नाती होत्या. हे कुटुंब मंगळवारी रात्री कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे येथे परतत असतांना ही घटना घडली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची गाडी कालव्यात कोसळली व हा अपघात झाला.
हा अपघात मंगल कार्यालयाजवळ असलेल्या ताकारी कालव्यात पडली. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक एक मुलगी जखमी झाली आहे. मृतांमध्ये राजेंद्र पाटील (६०), त्यांची पत्नी सुजाता पाटील (५५), मुलगी प्रियांका खराडे (३०), नात ध्रुवा (३), राजवी (२), कार्तिकी (१) यांचा समावेश आहे. तर राजेंद्र यांची दुसरी मुलगी स्वप्नाली भोसले (३०) ही जखमी झाली आहे.