इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेतील आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा करण्यात आली. मद्यप्राशन करून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या आरोपीला केलेल्या या शिक्षेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली.
याच संतापाच्या लाटेला शब्दबद्ध करत सर्वसामान्य पुणेकरांच्या भावना या निबंधाच्या स्वरूपात बाहेर पडाव्यात याकरिता उपहासात्मक पद्धतीने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन पुणे शहर, युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेला उपस्थित राहत सहभागी स्पर्धकांशी मनमोकळा संवाद साधला.
माझी आवडती कार. (पॉर्शे, फरारी, मर्सडिज, की इतर), दारुचे दुष्परिणाम, नियम पाळा, अपघात टाळा, अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे. या आणि अशा अनेक विषयावरती ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माझ्यासह पुणे शहर काँग्रेस पक्षाचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.