पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टोलनाका परिसरात लेन क्रॉसिंग करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवार दि.(२६) दुपारच्या दरम्यान घडली. या जोरदार धडकेत बसमधील चालक व वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमीमध्ये चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील प्रवाश्यांचा समावेश असून यात जिवीतिहानी मात्र टळली आहे.
पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील ४० आगाराची एसटी बस क्रमांक एम एच ४० एन ९८१७ ही जळगाव कडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका परिसरात लेन क्रॉस करत पुढे असलेल्या केमिकल टँकरला या बसने पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या जोरदार धडकेत बसमधील चालक वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य केले.
हे प्रवासी झाले जखमी
गणेश देवराव निकम, जयश्री प्रशांत निकम,प्रशांत दिलीप निकम,लक्ष्मण बाविस्कर, विमल लक्ष्मण वाणी, दिनेश साहिराम अहिरे, राजेंद्र वसंत पाटील, सुरेखा सतीश येवले, हितेश साहिराम आहेर, (सर्व रा.चाळीसगाव) निकिता विशाल, संतोष कुमार पांडे, वैभव शिवाजी कुमावत, अविनाश सोमनाथ राठोड, प्रकाश मुरलीधर अमृतकर, मंगला रघुनाथ रायते (सर्व रा. नाशिक) गायत्री हनुमंत बैरागी,पूजा विनोद पवार, मनीषा विनोद पवार, भूमी दीपक बैरागी, संध्या दीपक बैरागी, कोमल किशोर बच्छाव, संगीता सोमनाथ बरगडे,गोपाळ धोंडू खैरनार, योगेश गोपाळ खैरनार, प्रदीप पांडुरंग खैरनार, गफ्फार शेख, रजिया शेख, सर्व रा. मालेगाव, आदिंसह चालक वाहकाचा जखमीत समावेश आहे.