नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम व सराफ व्यायवसायिकांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत २६ कोटी रुपयाची रोकड व ९० कोटीचे बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवस आयकर विभागाचे पथक ठाण मांडून होते. ३० तास ही तपासणी झाली.
नागपूर, जळगाव व नाशिक येथील आयकर पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ५० ते ५५ अधिकारी उपस्थितीत होते. या तपासणीत बंगला, घर व कार्यालयाची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे खासगी लॅाकर्स व बँकांमधील लॅाकर्सही तपासण्यात आले. नाशिक येथील कॅालेजरोड वरील ज्वेलर्स, बंगला व मनमाड येथील घरी हा छापा गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टाकण्यात आला होता. या कारवाईत पेन ड्रायव्ह व हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली आहे.
आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशांच्या निगराणीखाली नाशिक, नागपूर, जळगावच्या अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.