इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातमध्ये राजकोट येथील टीआरपी या गेमझोनमध्ये लागलेल्या आगीमध्ये २४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत गेम झोन आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.
या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, असे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केलं आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
उन्हाळ्याच्या शाळेला सुट्या असल्यामुळे या गेमझोनमध्ये मुलांची मोठी गर्दी होती. या घटनेत मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.