बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात अवकाळी, उष्णता, मान्सून, चक्री वादळाची स्थिती काय आहे? बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

by India Darpan
मे 25, 2024 | 5:55 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240525 173349 Collage Maker GridArt

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……
१-मान्सूनच्या वाटचालीची सध्य:स्थिती काय आहे ?
मान्सून प्रगतीपथावर असुन आज निम्मा बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने काबीज केला आहे. मान्सून आगमन भाकीत तारखेला म्हणजे ३१ मे दरम्यान केरळात तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात त्याचे आगमन होऊ शकते. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकरही सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी या सहा व लगतच्या जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे कदाचित अगोदरही होऊ शकतो. अर्थात हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर अवलंबून असेल.

२-मान्सूनपूर्व सरी कधी कोसळणार?
वरील तारखा या मान्सूनच्या सरासरी पावसाच्या आहेत. सध्याच्या उष्णतेच्या लाटा सदृश्य स्थिती पाहता, मान्सून पावसाच्या अगोदर वळीव स्वरूपातील पूर्वमोसमी, पावसाच्या सरीही कोसळू शकतात. शेतमशागतीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.

३-बंगालच्या उप सागरातील ‘ रेमल ‘ च. वादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल?
बंगाल उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरूपातील ‘ रेमल ‘ नावाचे चक्रीवादळ सोमवार २६ मे ला मध्य रात्री ला ताशी १३० ते १३५ किमी. चक्रकार वारा वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात चालु असलेल्या उष्णता लाट सदृश्य स्थितीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम जाणवणार नाही, असे वाटते. आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत चक्री वादळ संबंधी सुचवलेली नांवे व बनवलेली यादीनुसार आता येणाऱ्या चक्री वादळासाठी ओमान देशाने सुचवलेल्या ‘ रेमल ‘ नांव येत आहे. म्हणून ह्या पूर्वमोसमी हंगामातील चक्रीवादळाला ‘ रेमल ‘ नांव दिले आहे. अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ ‘ वाळू ‘ किंवा ‘ रेती ‘ होय.

४-विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी व उष्णतेची स्थिती किती दिवस असेल?
विदर्भ, मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात उद्या २६ मे पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार ३० मे पर्यन्त अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवते.

५-कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी व उष्णतेची स्थिती किती दिवस असेल ?
मुंबईसह कोकण सह खान्देश, मध्य महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात अवकाळीची स्थितीबरोबरच पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार १ जून पर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवते.

६-महाराष्ट्रात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही का जाणवतोय?
कोकण वगळता महाराष्ट्रात सध्याचे दुपारचे कमाल तापमान ४० ते ४४ तर पहाटेचे किमान तापमान हे २८ ते ३० डिग्री से.ग्रेड दरम्यानचे राहून सध्याच्या सरासरी तापमानापेक्षा तकमाल ३ ते ४ तर किमान ४ ते ५ डिग्री से.ग्रेडने अधिक राहण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, असे वाटते.मुंबईसह कोकणात मात्र कमाल तापमान ३४ तर किमान तापमान हे २६ डिग्री से.ग्रेड दरम्यानचे राहून सरासरी तापमानापेक्षा ते ३ ते ४ डिग्री से.ग्रेडने अधिक असेल. तेंव्हा तेथेही दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही जाणवेल, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी केला हा गौप्यस्फोट

Next Post

पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक…(बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 99

पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक…(बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011