इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली. पुणे पाठोपाठ नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. जखमी झालेल्यांना नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गाडीची नासधूस केली. काचाही फोडल्या. पोलिसांनी आता तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
गर्दीचे ठिकाण असलेल्या झेंडा चौकात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या अपघातानंतर नागरिकांनी गाडीतील तरुणांना ताब्यात घेतले.
कारचालक आणि त्याच्यासोबतचे दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि गांजासदृष्य वस्तू सापडल्या आहेत.
संतापलेल्या नागरिकांनी गाडीची नासधूस केली. काचाही फोडल्या. पोलिसांनी आता तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.