इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या ट्रेंडचे अंतिम मूल्यांकन राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी नवीन व्हिडिओमध्ये सादर केले आहे. यात ४०० किंवा ३०३ सोडा, भाजप २७२ च्या पुढे जाणार नाही. वारे अधिक जोराने वाहत असेल तर एनडीएलाही बहुमत मिळण्याची शक्यता नाही असे भाकितही त्यांनी व्यक्त केले आहे.
यादव म्हणाले की, निवडणुकीच्या ट्रेंडबद्दल सत्य सांगणारा माझा मागील व्हिडिओ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला होता. प्रत्येकाच्या सहमती, असहमती, टीका आणि प्रश्नांसाठी धन्यवाद. तसेच मीडियाच्या गोंधळापासून वाचण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ पहा आणि दाखवा.
या व्हिडिओ नंतर दुसरे राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यात म्हटले आहे की,
देशातील निवडणुका आणि सामाजिक-राजकीय समस्या समजून घेणारा विश्वासू चेहरा. योगेंद्र यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे “अंतिम मूल्यांकन” शेअर केले आहे.
योगेंद्रजींच्या मते, या निवडणुकीत भाजपला २४०-२६० जागा मिळू शकतात आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३५-४५ जागा मिळू शकतात. म्हणजे भाजप/एनडीएला २७५-३०५ जागा. देशात सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे आणि लोकसभेत भाजप/एनडीएकडे ३०३/३२३ जागा आहेत. (शिवसेनेने एनडीएचा भाग म्हणून १८ जागा जिंकल्या पण आता त्यांच्यासोबत नाही) आता कोणाचे सरकार स्थापन होत आहे याचे आकलन तुम्हीच करा. कोण कोणाबद्दल बोलतंय हे ४ जूनला कळेल.