इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हैदराबादने हा सामना ३६ धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाज यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
सनरायजर्स हैदराबादने राजस्थानसमोर १७६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थानला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १३९ धावाच केल्या. राजस्थानकडून ध्रुव जुरेल या युवा फलंदाजाने अर्धशतक केले. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.
या सामन्यात राजस्थानचा पराभव झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सनरायजर्स हैदराबादची फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी वेळ आहे.