इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदापूरः तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी सकाळी हल्ला करण्यात आला. पाटील यांना धक्काबुक्की करून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला. तर आमदार रोहित पवार यांनी कृपया गृहमंत्र्यांना कोणी ही राजीनामा मागू नये, कारण अजून कोणाच्या गाडी खाली कुत्र आलेलं नाही.
तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाटील सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या कार्यालयाकडे जात होते. संविधान चौकात विना क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा वाहन चालक मल्हारी मखरे यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गाडीवर गजाने हल्ला केला. पाटील यांच्यावरही काठीने हल्ला चढवला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हा हल्ला कुणी व कशासाठी केला? हे समजू शकले नाही.