इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – हिट ॲंड रन’ प्रकरणात अग्रवाल कुटुंबीयांचा कार चालकावर तोच कार चालवत असल्याचे सांगण्यासाठी दबाव होता, असा गौप्यस्फोट पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला. येरवाडा पोलिस ठाण्यात आरोपी पिझ्झा देण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.
वेदांत अग्रवालचे वडील आणि आजोबाने कार वेदांत चालवत नव्हताच, असा कांगावा केला आहे. त्याच्या मित्रांनीही तसेच सांगितले असून अजून काही साक्षीदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चालकाने ही स्वतःच कार चालवत असल्याची कबुली दिल्याचे अग्रवाल कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आता पोलिस आयुक्तांनी चालकावर दबाव असल्याचे सांगितल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांची पिझ्झा पार्टी झाल्याचे आयुक्तांनी नाकारले आहे. आरोपीचा रक्ताचा पहिला नमुना सकाळी आठ वाजता, तर दुसरा नमुना सायंकाळी सात ते आठ वाजता घेण्यात आल्याची माहिती देताना या गुन्ह्यत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कलम २०१ नुसार कारवाई करण्यचा इशारा अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त म्हणाले, की घटनेच्या दिवशी अल्पवयीन आरोपी कार चालवत नव्हता, तर चालक गाडी चालवत होता, सांगण्यात येत होते; परंतु काही घटनाक्रम बदलण्याचे प्रयत्न झाले. कार चालकानेही गाडी चालवत होतो असे सरुवातीला सांगितले. त्यासाठी त्याच्यावर कोणाचा दबाव होता, याची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली. या घटनेबाबत दोन एफआयआर करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. या केसचा आम्ही गांभीर्याने तपास करत आहे. आवश्यक पुरावे, तांत्रिक पुरावे आम्ही जमा करीत आहोत. पुरावे कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची चौकशी सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी करत आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.