नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार नाशिक जिल्हा परिषदेतील लघुलेखक (उच्चश्रेणी) व कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदांचे निकाल आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर आज रोजी दोन्ही पदांसाठीच्या प्रारूप निवड यादी व प्रतिक्षा यादी या बुधवार दि. २२.०५.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला असून ही निवड यादी नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.
प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षायादी ही करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मा.जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली असून त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी लवकरच करण्यात येणार आहे दि. ४ जून नंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.