इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाडच्या युनियन बँकेत विमा प्रतिनिधीला अनेकांनी बँकेत ठेवी भरण्यासाठी व नुतनीकरणासाठी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार उघडीस आल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याची वाच्यता होताच अनेक ठेवीदारांनी बँकेत धाव घेतली त्यामुळे एकच गर्दी बँकेत झाली.
सुभाष देशमुख असे त्या ठेवीदाराचे नाव असून त्याने अनेकांकडून बँकेत मुदत ठेवी ठेवण्यासाठी व नूतनीकरणासाठी ठेवीदारांकडून बेरर चेक घेतले व ते स्वताच्या नावावर परस्पर वटून करोडो रुपयाचा अपहार केला. असल्याच बोलले जात आहे.
दरम्यान याप्रकरणी वरिष्ठ अधिका-यांच एक पथक चौकशीसाठी मनमाड मध्ये दाखल झाले असून त्यांच्या मार्फत या गैरव्यवहाराची चौकशी केली जात आहे बँकेने ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी दिली असून,संबधित विमा प्रतिनीधी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे .दरम्यान संतप्त झालेल्या ठेवीदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला तर काही ठेवीदारांनी बँकेच्या बाहेर ठिय्या मांडत आमचे पैसे परत द्या अशा घोषणाही दिल्या.