नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सितागुंफा जवळ किरकोळ वादातून दोघा मित्रांना मारहाण करीत त्रिकुटाने एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत पाटील उर्फ सेल्फी (रा.शनी चौक), अजय देसले उर्फ डॉक्टर व रोहिदास अहिरे अशी दोघा मित्रांना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत राहूल विजय कानडे (२७ रा.जोशीवाडा नागचौक) या युवकाने फिर्याद दिली आहे. कानडे व अजय वसंत भोजणे हे दोघे मित्र सोमवारी (दि.२०) सितागुंफा भागात गेले होते.
या ठिकाणी संशयित त्रिकुटाने त्यांना गाठून किरकोळ कारणातून वाद घातला. हमरी तुमरीवर गेलेल्या वादात त्रिकुटाने दोघा मित्रांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात एकाने खाली पडलेली बिअरची बाटली भोजणे याच्या डोक्यात फोडल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.