पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कल्याणीनगर भागात रविवारी झालेल्या अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे हे पोलिस स्थानकात गेले. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याची टीका झाली. या टीकेननंतर टिंगरे यांनी स्पष्टीकरणही दिले. पण, त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत तीन प्रश्न विचारले आहे.
या पोस्टमध्ये दानवे म्हणतात, आमदार सुनील टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे!
याचे उत्तर द्या मग..
१. गेले का होतात तुम्ही पोलिस ठाण्यात मध्यरात्री?
२. एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोचला आहात?
३. प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी. यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते?
या प्रश्नांची उत्तरे आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यायला हवीत.