नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजा करुन प्रभूरामचंद्राचे दर्शन घेतले. आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी प्रधान संकल्प सोडला. यावेळी महावस्त्र प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, शुभम मंत्री, अजय निकम यांनी दिली. यावेळी प्रणव पुजारी मुकुंद पुजारी उपस्थित होते.
यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, आज रामरायाचे दर्शन घेऊन आनंद झाला. भारत देश जगात महासत्ता व्हावी जागतीक पातळीवर देशाचं नाव सर्वोत्तम व्हावं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सारखे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. सर्व भारतीय जनता सुखी व्हावे हिच श्रीराम चरणी प्रार्थना.
आज एस. जयशंकर यांचे नाशिकमध्ये कॉलेज रोड येथे व्याख्यान व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते नाशिकला आले होते.