मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर ३०१ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील ३७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10 , नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण – 14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.