इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभेमध्ये आमदार रोहित पवार हे भावूक झाले. ते भाषण करतांना ढसाढसा रडले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतरचा शरद पवार यांच्यासोबतचा एक प्रसंग आपल्या भाषणात सांगता सांगता रडू कोसळले.
यावेळी रोहित पवार म्हणाले, जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसलो होतो. शरद पवारांसोबत चर्चा करत होतो. शरद पवार टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. टीव्ही बघत-बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिलं. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही अजिबात काळजी करु नका. आपला जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तो आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपण नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची. जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी घेण्याच्या लेव्हलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे शरद पवार यांचे शब्द आहेत असं रोहित पवार यांनी सांगितलं आणि त्यांना भर मंचावर रडू कोसळले.
यावेळी ते म्हणाले की, साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करुन पुन्हा करु नका. तुम्ही आमचे जीव आहात. तुम्ही आमचे आत्मा आहात असे रोहित पवार यांनी सांगितल्यानंतर आपले भाषण पूर्ण केले.
या प्रसंगावर त्यानंतर दुस-या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका करत नौटंगी म्हटली व रडण्याचा अभिनयही केला.
सुप्रिया सुळे यांच्या सभा थेट बघा…..