नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक – पुणे मार्गावर गोमांसची वाहतूक करणारी कार पोलीसांच्या हाती लागली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चालकास बेड्या ठोकत पोलीसांनी गोमांसासह कार असा सुमारे १ लाख ८० हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.
नवाज रशिद सय्यद (५० रा.बागवानपुरा,भद्रकाली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत अंमलदार प्रमोद ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक पुणे महामार्गावरून गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार रविवारी (दि.२१) शिंदे टोल नाका भागातील हॉटेल विसावा समोर पोलीसांनी वाहन तपासणी केली असता संशयित चालकाच्या कारमध्ये जनावरांचे मास आढळून आले. चालकास बेड्या ठोकत पोलीसांनी कारसह गोमास असा सुमारे १ लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.