शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार, २२ एप्रिल २०२४ रोजी तीन उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज ८ व्यक्तींनी १० नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना) यांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली. चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र असे तीन उमेदवारांनी आजच्या दिवशी ५ अर्ज दाखल केले.