कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लर मध्ये २०२२ मध्ये येऊन शारीरिक संबंध ठेवले त्याच बरोबर वेळोवेळी आरोपी याने फिर्यादीसोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन व जीवे मारण्याची धमकी देत अन्याय अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील अर्जुन देवकर (रा.टाकळी, कोपरगांव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २२/२०२२ रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसयासाठी आरोपी याने रुपये ५ लाख रुपये उसनवारी दिले. असता आरोपी याने पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादी हिचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असून फिर्यादी हिच्या २०२२ रोजी पार्लर मध्ये त्याच बरोबरी आरोपी याच्या धारणगाव रोड येथील ऑफिस वर आणि नाशिक येथील एका लॉज वर बळजबरीने फिर्यादी हिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेऊन धमकावले.
त्यानंतर पीडितेने आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीला कोपरगाव येथे न्यायालयात रविवार हजर केले असता आरोपी यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या .घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहे.