इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार आणि गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
सोमवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता, एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. या प्रवेश सोहळ्यामुळे कोकणात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट करत असून त्यात अनेक नेते राष्ट्रवादीत येत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.