मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील संगमेश्वर भागात जून्या वादातून रफिक शेख नावाच्या युवकाचा धारदार हत्याराने रात्री खून केल्याची घटना घडली. खून करण्यात आलेला तरुण रस्त्याने पळत जात असतांना खाली कोसल्याच्या घटनेचा काही भाग हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दरम्यान घटना घडल्याने अप्पर पोलिस अधिकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिस अधिक तपास करीत आहे.