रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

by India Darpan
एप्रिल 11, 2024 | 8:44 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
VM

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपुरमध्ये माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ आदर्श आचार संहिता आणि नागपुरात कलम १४४ लागू असताना भाजपचे सुमारे ४० कार्यकर्ते अश्लिल घोषणाबाजी केली. तर यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत होते असा आरोप करत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी भारतीय निवडणूक आयोग, नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अंबाझरी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.

लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या अनुषंघाने नागपूर पोलिस आयुक्तांनीही १७ मार्च २०२४ रोजी कलम १४४ लागू केली.तरीही भाजपने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवास्थानासमोर अवैध पद्धतीने गोंधळ घालण्याची तयारी केली. याअंतर्गत ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पूर्वनियोजित पद्धतीने मुत्तेमवार यांच्या निवासस्थानाजवळ गोळा झाले. नागपूर लोकसभा निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. त्यावरुन हे सर्व कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरुनच आले असल्याचे मुत्तेमवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

गोळा झालेल्या भाजप कार्यकत्यांनी अश्लिल घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या समोरच भाजपचे पदाधिकारी यांनी विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाविरुद्ध अश्लिल घोषणा दिल्या. त्यांच्या हातात मोठे छापलेले बॅनरही होते. शिवाय या कार्यकर्त्यांनी घराजवळ पुतळाही जाळला. जवळपास तासभर हा सर्व प्रकार घडल्यावरही पोलिस मुकदर्शकाच्या भूमिकेत होते. या घटनेची माहिती वेळेपूर्वीच पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दूरध्वनीवर दिली होती, अशी तक्रार मुत्तेमवार यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा, भादवि, आचारसंहिता कायदा, आणि सीआरपीसीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली आहे.

या घटनेवरुन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ईशाऱ्यांवर पोलिस आय़ुक्त नाचत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोपही तक्रार अर्जात मुत्तेमवार यांनी लावला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकू… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

Next Post

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

Next Post
Election logo nivdnuk aayog e1702627232547

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011