येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणा-या तिघांना पोलिसांनी पकडले आहे, यातील दोघे जण अल्पवयीन असून चॉपरचा धाक दाखवून हे तिघे घरफोड्या करीत होते. या चोरांकडून पोलिसांनी ४९ हजाराची रोकड व चॉपर जप्त केले आहे.
पकडलेल्या या चोरांनी एकुण नऊ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली असून येवला शहर पोलिस अधिक तपास करीत आहे.