नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दीड लाखाची लाच घेतल्याच्या प्रकरणात धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी पोलिस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक व दोन हवालदार विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष , 35 वर्ष, जिल्हा- धुळे
आलोसे –
1) दत्तात्रय सखाराम शिंदे, पद- पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ( वर्ग- 1) , रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड
2) नितीन आनंदराव मोहने, पद -पो हवा. 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, ( वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे.
3) अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद- पो. हवा 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. ( वर्ग- 3) रा .- प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- दि. 01.04.2024 रोजी 2,00,000/-रुपये .
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक- दि. 01.04.2024 रोजी 1,50,000/- रू
लाचेचे कारण – यातील नमूद तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 2,00,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम आलोसे क्र 2 व आलोसे क्रं 3 यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी आलोसे क्रमांक 2 व आलोसे क्र 3 यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. वरील अलोसे 1 ते 3 यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. पोलीस महासंचालक सो., महाराष्ट्र राज्य मुंबई.
परिवेक्षण अधिकारी-
श्री. अभिषेक पाटील
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.धुळे
मो.न.8888881449
सापळा अधिकारी-
रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, , पो.ना. संतोष पावरा, पो. शि.रामदास बारेला, चालक पो. शि. बडगुजर
सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .