रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आश्रमशाळेतील दुधाचा दर १४६ रुपये असा आरोप केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने केला हा खुलासा….

by India Darpan
मार्च 22, 2024 | 11:22 pm
in संमिश्र वार्ता
0
gov e1709314682226

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर आदिवासी विकास विभागाने स्पष्टीकरण केले आहे. या खुलाश्यात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठयाबाबत तरतुद आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा हया अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध पुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर निविदेचे मुल्य ठरवतांना टेट्रापॅक उत्पादन करणारे उत्पादक (डेअरी) तसेच महानंद डेअरी तसेच इतर नामांकित उत्पादकांकडून दर प्राप्त करुन घेण्यात आले होते. त्यानुसार सदर दरांची सरासरी रु. 27.70 प्रती 200 मी. ली. टेट्रापॅक इतका दर निश्चित केला होता.
खरेदी धोरणानुसार पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत एकूण सहभाग घेतलेल्या पात्र निविदाकारांचा तपशिल व त्यांनी नमूद केलेले दर खालीलप्रमाणे आहे :

1 नाशिक 29.20 29.10 33.38 28.60 28.60 28.60 कर्नाटका को-ऑपरेटीव मिल्क / पराग मिल्क फुडस् लि. पुणे
2 ठाणे 29.00 28.90 33.38 28.70 29.30 28.70 पराग मिल्क फुडस् लि. पुणे
3 अमरावती 29.40 29.00 33.38 29.30 29.70 29.00 श्री. वारणा सहकारी दुध उत्पादक संघ लि. कोरेनगर
4 नागपुर 28.80 29.10 33.38 29.50 29.80 28.80 इंदापुर डेअरी ॲन्ड मिल्क प्राडक्टस् लि. पुणे

उक्त तपशिलानुसार 5 निविदाकारांपैकी 4 निविदाकारांचे दर अपर आयुक्त निहाय न्युनतम आहेत व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई यांचे दर जास्त होते. न्युनत दरधारक यांचेशी वाटाघाटी करुन सर्व अपर आयुक्त निहाय एकच दर रुपये 26.25 प्रति 200 मि. ली. टेट्रापॅक असा निश्चित करण्यात आला होता. दिनांक 12.01.2024 रोजी चारही पुरवठाधारक यांना अपर आयुक्त निहाय पुरवठा आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार टेट्रापॅक दुधाची रु. 131.25 प्रती लीटर अशी होते. यामध्ये सर्व कर व अति दुर्गम भागातील 497 आश्रमशाळा स्तरावर पोहोच आहेत.

सदर निविदेत महानंद डेअरी यांनी देखील सहभाग घेतला होता. तथापि महानंद डेअरी यांचे दर जास्त होते. त्यामुळे न्युनतम दरधारक यांचेशी अजुन वाटाघाटी करुन सदर दर रु.26.25 निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महानंद डेअरी व न्युनतम दरधारक यांचे दरामधील फरकानुसार रु. 33 कोटी रुपयाची शासनाची बचत झालेली आहे. तसेच उक्त खरेदी प्रक्रिया शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक 01.12.2016 मध्ये विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन राबविण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले सुगंधी दुध यामध्ये Homogenized & Pasteurized Milk Fat % -3.0 to 3.5 S.N.F. %-8-5 Min Meeting FSSAI Standard of flavoured milk असा दर्जा ठेवण्यात आला आहे. विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी टेट्रापॅक मधील दुध हे आहेत त्या स्थितीत पॅकेट फोडुन तात्काळ पिण्यास योग्य व पोषणमुल्य असलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले टेट्रापॅक हे 1 लिटर मध्ये आहे तसेच ते सुगंधी दुध आणि पिण्यास तात्काळ उपलब्ध होईल अशा स्वरुपात नाही. तरी निविदेत विहीत केलेल्या स्पेशिफीकेशनचे सुगंधी दुध विदयार्थ्यांना तात्काळ उपलब्ध व पिण्यास योग्य असुन विदयार्थी सदर दुध आवडीने पितात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी सहा दिवसाची ईडी कोठडी

Next Post

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप पंतप्रधानांच्या पुतळ्याचे करणार दहन…तीन दिवस असे आहे आंदोलन

Next Post
GJSuLIZXQAA4Bus

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप पंतप्रधानांच्या पुतळ्याचे करणार दहन…तीन दिवस असे आहे आंदोलन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011