नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंगाडा तलाव भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकदून मकसुद खान (रा.कैलासकिरण सोसा.गुरूद्वारारोड शिंगाडा तलाव) यांनी फिर्याद दिली आहे. खान कुटुंबिय शनिवारी (दि.१७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दोन लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार देविदास गाढवे करीत आहेत.