बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी…मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

by India Darpan
मार्च 15, 2024 | 2:12 pm
in राज्य
0
मुंबई शहर जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीचा आढावा 1 1140x570 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसेवा हक्क कायद्याने नागरिकांना सेवा देण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सेवा देणे आपले कर्तव्य आहे. या भावनेने वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध करून देत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणी संबंधित आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. श्रीवास्तव म्हणाले की, सेवा घेणे नागरिकांचा हक्क आहे. तसेच सेवा देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवा देण्यास विलंब झाला तर लोक सेवा देण्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र व प्रोत्साहनपत्र देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन दिली पाहिजे. असे सांगून लोकसेवा हक्क कायद्याविषयी मार्गदर्शक सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा यासाठी अधिकतम सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक सुधारणा करून या सेवा ऑनलाइन आणि वेळेत देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगावला भूमीअभिलेख विभागासाठीच्या १५ रोवर मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट

Next Post
GIo5duyWkAAgCtz e1710492514457

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011