Last updated on March 16th, 2024 at 09:16 am
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाली आहे. तृणमल काँग्रेसच्या अधिकृत ट्विट अकाउंटवर पोस्ट करुन ही माहिती दिली आहेत. त्यात ममता बँनर्जी यांना दुखापत झाल्याचे फोटोही शेअर केले आहे. पण, ही दुखापत कशी झाली हे त्यात दिलेले नाही. या पोस्टमध्ये बरं होण्यासाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जींना एसएसकेएम हॅास्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्या ट्रेड मिल करतांना घरात पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बॅनर्जींनी त्यांना हॅास्पिटलमध्ये दाखल केले. याअगोदरही त्या एका अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यावेळेसही त्यांच्या डोक्याला लागले होते.