बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ११ हजार ४४३ प्रकरणे निघाली निकाली; इतके कोटी तडजोड शुल्क वसूल

by India Darpan
मार्च 4, 2024 | 2:17 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240304 WA0263 1 e1709542034981

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण ११ हजार ४४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ७९ कोटी ८९ लाख १२ हजार ९०८ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड
एका मोटार अपघात प्रकरणात ४० लाख रूपयांची तडजोड

मोटार अपघात प्रकरणात २०२१ साली मोटार सायकल व ट्रक मध्ये नाशिक-दिंडोरी रोड, वाढणे फार्म, म्हसरूळ शिवार येथे अपघात झाला होता. या अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे वय २९ वर्षे होते. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये ४० लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली.

१४४ मोटार अपघात प्रकरणांमध्ये ९ कोटी ५० लाख ९३ हजार रूपयांची मिळाली नुकसान भरपाई
मोटार अपघात प्रकरणांमध्ये लोकअदालतीत एकूण ९२८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील १४४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यात वेगवेगळ्या अपघाताध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी व मयत झालेल्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळणासाठी प्रकरणे दाखल केले होते. यात तडजोडीअंती एकूण ९ कोटी ५० लाख ९३ हजार रूपयांची भरपाई होवून पक्षकांरांनी समाधान व्यक्त केले.

मोटार वाहन चालकांना दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण १ हजार ६८७ मोटार वाहन प्रकरणामध्ये १२१ प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालीयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

कौटुंबिक वादविवाद असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड
लोकअदालतील एकूण ७५ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यामुळे सर्व 75 प्रकरणांमधील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. तसेच सर्व प्रकरणांमध्ये एकूण १५० कुटुंबांना संबंध पूर्ववत झाल्याने समाधान मिळाले

निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 614 प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- 144 प्रकरणे
▪️कामगार विषयक- 14 प्रकरणे
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 75 प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 344 प्रकरणे
▪️इतर – 1060 प्रकरणे

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख 95 हजार 451 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 11 हजार 192 प्रकरणे निकाली निघाली असून रूपये 11 कोटी 89 लाख 98 हजार 178 रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चंदीगड महापालिकेचे वरीष्ठ उपमहापौर व उपमहापौर पद भाजपने जिंकले…

Next Post

कारमधून चोरट्यानी पावणे दोन लाखाच्या रोकडसह महत्वाची कागदपत्र चोरुन नेली… काठेगल्ली सिग्नल जवळील घटना

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

कारमधून चोरट्यानी पावणे दोन लाखाच्या रोकडसह महत्वाची कागदपत्र चोरुन नेली… काठेगल्ली सिग्नल जवळील घटना

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011