इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी केली. राजकीय कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रीय करण्याचे त्यांनी जाहीर केले. गौतम गंभीरने राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्धार केला आहे. क्रिकेटमुळे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
गौतम गंभीर हे पूर्व दिल्लीचे भाजप खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच त्यांनी गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.