शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इस्रोने केला युवा वैज्ञानिक कार्यक्रम जाहीर…अशी करता येईल नोंदणी

by India Darpan
फेब्रुवारी 17, 2024 | 6:56 pm
in संमिश्र वार्ता
0
image001VQIZ

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलामुलींना आणि तरुणांना अवकाश आणि विश्वाबद्दल आकर्षण असते. ते खूप जिज्ञासू आहेत आणि त्यांची सर्व खगोलीय घटनांबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. तरुण मनांच्या या उत्कट कुतूहलाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शालेय मुलांसाठी “यंग सायंटिस्ट प्रोग्राम” अर्थात “युवा वैज्ञानिक कार्यक्रम” (युविका) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञानआणि सध्याच्या काळात अवकाश अभ्यासाविषयी उपयोगात येणारे आधुनिक मूलभूत ज्ञान प्रदान करणे हा आहे. इस्रोने “तरुणांना केंद्रस्थानी ठेवून” हा कार्यक्रम तयार केला आहे. कारण आपण सर्वजण जाणतो की तरुणांना जर त्यांना संधी मिळाली तर ते अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहभागी होऊ शकतात आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. कारण हेच तरुण आपल्या राष्ट्राच्या भविष्याचा पाया (बिल्डिंग ब्लॉक्स) आहेत.

युविका कार्यक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) आधारित संशोधन आणि त्या अनुषंगिक अभ्यासक्रमामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

देशातील ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान आणि अवकाश अभ्यासक्रमाशी निगडित तंत्राविषयी मूलभूत ज्ञान मिळावे ही यंग सायंटिस्ट प्रोग्राम – युविका कार्यक्रमाची संकल्पना आहे. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन प्रगत कल समजण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात दोन आठवड्यांचे वर्ग प्रशिक्षण, प्रयोगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, कॅनसॅटवर तंत्रज्ञानाविषयी माहिती, रोबोटिक किट, इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मॉडेल रॉकेट्री संवाद आणि क्षेत्रिय भेटी यांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम 2019, 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 111, 153 आणि 337 विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता, जो भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो. यावेळी विद्यार्थ्यांना भौगोलिक स्थानानुसार पाच तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि त्यांना व्हीएसएससी (VSSC), युआरएससी (URSC), एसएसी (SAC), एनआरएससी (NRSC), एनइएसएसी (NESAC), एसडीएससी (SDSC), एसएचएआर (SHAR) आणि आयआयआरएस (IIRS) येथे प्रशिक्षण देण्यात आले.

इस्रोला युविका – 2023 कार्यक्रमासाठी जबरदस्त प्रतिसाद मिळाला, भारताच्या कानाकोपऱ्यातून 1.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी युविका – 2023 साठी नोंदणी केली होती. शेवटची परीक्षा, सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

या प्रशिक्षण कालावधीमध्ये वर्ग प्रशिक्षण, रोबोटिक्स क्षेत्रातले आव्हाने, डीआयवाय (DIY) असेंब्ली ऑफ रॉकेट/सॅटेलाइट, स्काय गेझिंग इ. तांत्रिक सुविधा भेटी आणि अंतराळ शास्त्रज्ञांशी संवाद यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

युविका-2024 साठी नोंदणी कशी करावी?
इस्रो ने युविका-2024 ची घोषणा केली आहे. युविका-2024 साठी नोंदणी प्रक्रिया 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
क्रमांक-1: इस्रो अंतरीक्षा जिग्यासा प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा: https://jigyasa.iirs.gov.in/registration
क्रमांक-2: वरील वेबसाइटवर यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुमचा ईमेल प्राप्त झाल्याची पडताळणी करा. कृपया तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवलेल्या पडताळणी लिंकवर क्लिक करा.
क्रमांक-3: SpaceQuiz मध्ये सहभागी व्हा. क्विझसाठी उपस्थित राहण्यापूर्वी क्विझ मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.
क्रमांक-4: तुमची वैयक्तिक माहिती (प्रोफाइल) आणि शैक्षणिक तपशील भरा.

क्रमांक-5: विद्यार्थ्याने आपल्या प्रमाणपत्रांची फोटो कॉपी घेणे आवश्यक आहे आणि पडताळणीसाठी मुख्याध्यापक/शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करून ते प्रमाणित केले पाहिजे. सत्यापित प्रमाणपत्र स्कॅन करणे आणि वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे. साक्षांकित प्रमाणपत्रांची फोटो कॉपी आणि पडताळणीसाठी प्रमाणपत्र वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे
क्रमांक-6: तुमचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापक/शाळेचे प्रमुख/पालक/नातेवाईक यांच्याकडून पडताळणी करून घेण्यासाठी तयार ठेवा (विद्यार्थ्याने जोडलेल्या प्रमाणपत्रामध्ये आणि विद्यार्थ्याने सादर केलेल्या पडताळणीचे प्रमाणपत्र यामध्ये कोणतीही विसंगत माहिती आढळली तर अशी माहिती विद्यार्थ्याची उमेदवारी रद्द करण्यास कारणीभूत ठरेल).
क्रमांक-7: तुमचा दस्तऐवज स्कॅन करा आणि अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
युविका – 2024 साठी कोण अर्ज करू शकेल?

भारतात 1 जानेवारी 2024 रोजी इयत्ता 9 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी इस्रोच्या यंग सायंटिस्ट प्रोग्राम (युविका) साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेले सर्व तपशील, अपलोड केलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकदा भरलेले (सबमिट केलेले) अर्ज नंतर संपादित किंवा सुधारित केले जाऊ शकत नाहीत. अधिक माहितीसाठी, अर्जदार विद्यार्थी इस्रो अंतरीक्षा जिज्ञासा या वेबसाइटला भेट देऊ शकतात: https://jigyasa.iirs.gov.in/yuvika

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक महानगरपालिकेच्या या धोरणास महाराष्ट्र चेंबर व व्यापारी संघटनांचा तीव्र विरोध

Next Post

उच्च शिक्षण प्रवाहात या महिलांच्या प्रमाणाबाबत राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

Next Post
unnamed 2024 02 17T185951.104 e1708176710239

उच्च शिक्षण प्रवाहात या महिलांच्या प्रमाणाबाबत राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011