इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करण्याची घोषणाकेली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान त्यांनी दावा केला होता, की सीएए अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही.सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. त्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आहे.
शाह म्हणाले, की काँग्रेसने शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “जेव्हा देशाची फाळणी झाली आणि तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा सर्वांना भारतात पळून जायचे होते, तेव्हा काँग्रेसने सांगितले होते की तुम्ही इथे या, तुम्हाला इथले नागरिकत्व दिले जाईल.विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “सीएएबद्दल आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि चिथावणी दिली जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. ते म्हणाले, की मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी बांगला देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.