वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
हिस्टरी टीव्ही-१८ वरील लोकप्रिय शो ‘OMG! Yeh Mera India’चा दहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर होणार आहे. हिट मालिकेचा नवीन सीझन प्रेक्षकांना संपूर्ण देशाची सफर घडवेल आणि त्यातून नावीन्यपूर्णता, आमूलाग्र बदल आणि प्रेरणा या गोष्टींची ओळख होईल.
या शोचं सूत्रसंचालन लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक करणार आहे. विनोदवीर आणि निवेदक कृष्णा अभिषेक हे लोकप्रिय व्यक्तीमत्व पहिल्या दिवसापासून या ट्रेंडिंग शो चा चेहरा ठरला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “ओएमजी! ये मेरा इंडिया’ही मालिका माझ्या करियरमधील सर्वाधिक यशस्वी शोजपैकी एक आहे. या महान देशाच्या अज्ञात गोष्टी जगापुढे आणणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा नवीन सीझन खूप सुंदर गोष्टी आपल्यासमोर आणेल आणि ती प्रेक्षकांसाठी नक्कीच एक दृश्य मेजवानी असेल.
हा सीझन खूप खास आहे आणि तो शोच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.”ओएमजी! ये मेरा इंडिया ही मालिका देशाच्या अद्वितीय वैविध्यपूर्णता आणि वेगळेपणावर प्रकाशझोत टाकणारी ठरली आहे. दहावा सीझन आतापर्यंतचा सर्वात वेगळा ठरेल. हिस्टरी टीव्ही१८वर टीमने तयार केलेल्या ४० अप्रतिम खऱ्या कथांसह, दहापैकी प्रत्येक भागात अशा व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेतो ज्यांनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने समाजात बदल घडवले आहेत.त्यांच्या महान कार्याची दखल OMG- ये मेरा इंडिया घेते.