इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड जिल्ह्यात नरसी येथील ओबीसी महामेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले. ओबीसींना आरक्षण मिळाल्यामुळे मोठा बदल झाला. या बदलामुळे झालेले सामाजिक, राजकीय परिणाम लक्षात येताच आता पुन्हा आरक्षण काढून घेण्याचे प्रयत्न होत आहे, असेही ते म्हणाले.
तरुणांना, शेतकऱ्यांना तसंच आरक्षणाच्या संदर्भात विविध जात समूहांना आपसात लढवत ठेवणे, ही रणनीती देशात आणि राज्यात आखली गेली आहे, असा आरोप त्यांनी केला. ओबीसी आरक्षण हे वेगळे आहे, आणि न्यायालयाच्या परवानगीने मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते वेगळे असेल, असेल आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात आरक्षणाची भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीमागे ओबीसी समूह राहील, असे ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले. प्रा. टी.पी. मुंडे, माजी खासदार विकास महात्मे, ॲड. सचिन नाईक आदींनी मार्गदर्शन केले.