मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, प्रागतिक भारताची ७५ वर्षे आणि इथल्या लोकांचा उज्ज्वल इतिहास, संस्कृती आणि कामगिरीचे यश साजरे करत आहे. ‘व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेवर भर देणारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच भाग म्हणून, ‘माय हँडलूम, माय प्राईड’ या घोषणेनुसार, वस्त्रोद्योग मंत्रालय, हातमाग आणि हस्तकौशल्याच्या वस्तू घडवणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन देत आहे.
त्या अनुषंगाने, मुंबईतल्या, विणकर सेवा केंद्राद्वारे, नाशिकच्या चोपडा लॉन्स इथे, १० जानेवारी ते २३ जानेवारी २०२४ या काळात हातमाग मेळा आयोजित केला जाणार आहे. स्थानिक आमदार, देवयानी फरांदे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील, आणि त्यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होईल.
या हातमाग प्रदर्शनाअंतर्गत विविध राज्यांमधील हातमाग आणि हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री, भारतातील पारंपारिक कापडांचे प्रदर्शन, हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी समूह विकास उपक्रम, इंडिया हँडलूम ब्रँड, हँडलूम मार्क, मुद्रा योजना, विमा योजना-पीएमएसबीवाय, पीएमजेजेबीवाय, भारत निर्मित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ई-धागा अॅप, जीआय कायदा इत्यादी प्रमुख उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
उत्पादकांच्या जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून हातमाग उत्पादनांची माहिती, कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल. हातमाग उत्पादन उत्पादन आणि देशभरातील तसेच स्थानिक भागातील विक्री क्षेत्रातील यशोगाथा इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी सादर केल्या जातील आणि विणकरांशी संवादही आयोजित केला जाईल. या प्रदर्शनाला भेट देणारे विविध मान्यवर आणि पाहुण्यांना हातमाग विणकाम, चरखा आणि छपाईचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जाईल. या कार्यक्रमासाठी विणकर, हातमाग संस्था आणि हातमाग चिन्हाची नोंदणी आणि रेशीम चिन्हाची नोंदणी असलेल्या उत्पादक कंपन्यांशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विणकरांशी ते संवाद साधतील.
राष्ट्रीय एमएसएमई मंडळाचे सदस्य, प्रदीप पेशकर, प्रादेशिक आयुक्त (वस्त्रोद्योग) दीपक खांडेकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्याशिवाय, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संत कबीर पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक, डिझायनर, उत्पादक कंपन्या, एमएसएचसी नागपूर, महाटेक्स मुंबई आणि विविध राज्यांतील इतर विणकर हातमाग सहकारी संस्था देखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.