शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

by India Darpan
जानेवारी 3, 2024 | 10:33 pm
in स्थानिक बातम्या
0
unnamed 2024 01 03T223018.283 e1704301355158

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिली. महोत्सवाच्या तयारीकरीता समन्वय मंत्री, अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नाशिक येथे त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या आयोजनात कुठलीही कसर राहणार नाही. महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती, लोककला याविषयीची नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, केंद्रीय सचिव मीता राजीव लोचन आदी यावेळी उपस्थित होते.

नाशिक येथे दिनांक १२ जानेवारीला या राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यासाठी सुमारे लाखभर युवक – युवती उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रनगरी ते यंत्रनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशभरातील युवा वर्गाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही उणीव भासणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून समन्वय करण्यात येत आहे. विविध माध्यमांद्वारे महोत्सवाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला १४ दिवस या तारखेपासून माय हँडलूम, माय प्राईड या हातमाग प्रदर्शनीचे आयोजन…..वस्त्रोद्योग मंत्रालयाचा विशेष उपक्रम

Next Post

स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे या तारखेला जागतिक आर्थिक परिषद… मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

Next Post
eknath shinde cm5

स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे या तारखेला जागतिक आर्थिक परिषद… मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011